विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजना, १२ वी झालेल्यांना ६ हजार रूपये मिळणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा

 विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजना, १२ वी झालेल्यांना ६ हजार रूपये मिळणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार १७ जुलैला विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत १२ वी, डिप्लोमा व डिग्रीधारकांना विद्यावेतना दिले जाणार आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा धारकांना ८आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री आज शासकीय महापुजेसाठी पंढरपुरला आले होते. तेव्हा त्यांनी कृषी पंढरी २०२४ प्रदर्शनात सहभागी होऊन उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांसाठी या योजनेची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना आणली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं, पण लाडक्या भावाचं काय?त्याचं काय तर,त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार,आता बारावी पास झालेल्यांना ६ हजार, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार आणि डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजार रुपये महिन्याला स्टायपेंड दिला जाणार आहे. त्यामध्ये, वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो प्रशिक्षित होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे. Vidyavetan scheme for students, 12th passers will get Rs 6000 – Chief Minister’s announcement

ML/ML/PGB
17 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *