पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बस – ट्रॅक्टरचा अपघात – ५ जण ठार
पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बस – ट्रॅक्टरचा अपघात – ५ जण ठार
पनवेल, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर शिवकर गावाच्या जवळ रात्री १.१५ च्या दरम्यान पुण्याकडे दिशेने पंढरपूर वारीला जाणाऱ्या बसला भीषण अपघात होऊन त्यात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
कल्याण डोंबिवली येथील एकूण ४ बस पंढरपूरला निघाल्या होत्या. कल्याण वरून पंढरपूर येथे भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल MH ०२ FG ९९६६ चा पनवेल जवळ एक्स्प्रेस हायवेवर ट्रॅक्टर ला धडकून साधारण १:१५ वाजता अपघात झाला. सदर अपघातात ५ (४ पुरुष १ महिला) लोक मयत झाले ४३ जखमी लोकांवर MGM हॉस्पिटल कळंबोली येथे उपचार चालू आहेत.या अपघातानंतर जवळ जवळ २ तास पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
अपघात झाल्यावर २० फूट खाली रस्त्याच्या बाजूला बस कलंडली होती ती दोन हायड्रा च्या साहाय्याने बस बाहेर काढण्यात आली. बस बाहेर काढल्या काढल्या खड्यात सर्च ऑपेरेशन राबविण्यात आले.
यातून प्रवाश्याचे सर्व सामान, बॅग्स बाहेर काढण्यात आल्या.
त्याआगोदरच सर्वाना बाहेर काढण्यात आले. ५४ प्रवासी बसमध्ये होते.
Private bus going to Pandharpur – Tractor accident – 5 killed
तीन भाविक बस मधील तर दोन ट्रॅक्टर मधील प्रवासी असे एकूण ५ जण मृत झाले असून
७ जण अत्यवस्थ आहेत त्यांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच एकूण ४३ भाविक जखमी असून त्याना MGM कामोठे येथे दाखल करण्यात आले.
ML/ML/PGB
16 July 2024