तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू…

सिंधुदुर्ग, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने मुसळधार पाऊस होत आहे . त्यात दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर काहीसा जास्त आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाच्या चारी दरवाजातून हा विसर्ग सुरू झाला असून 46.38 क्युसेक्स वेगाने पाणी बाहेर पडत असल्याचे तिलारी पाटबंधारे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हे बाहेर पडलेले पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळते आहे . शिवाय तेरवण मेढे उन्नयी बंधाऱ्यातून विसर्ग होणारे पाणीदेखील तिलारी नदी पात्रात येऊन मिळत असल्याने तिलारी नदी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे . त्यामुळे तिलारी नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
ML/ML/SL
16 July 2024