प्रत्यक्षात कत्तल ५५०पेक्षा जास्त झाडांची? यंत्रणेकडून चुकीचे आकडे दिल्याचा आरोप

 प्रत्यक्षात कत्तल ५५०पेक्षा जास्त झाडांची? यंत्रणेकडून चुकीचे आकडे दिल्याचा आरोप

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पैठण रोडसह शहर परिसरातील इतर अनेक रस्त्यांवरची शेकडो झाडे काही वर्षांत तोडल्यानंतर आता नगर नाका ते दौलताबाद रस्त्यावरचे जुने वृक्ष तोडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांची संख्या साडेतीनशे असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात साडेपाचशेपेक्षा जास्त झाडे असू शकतात, अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही झाडे कुठल्याही परिस्थितीत न तोडता बाजूने रस्ता तयार करण्यात यावा किंवा इतर पर्यायांचा विचार करावा, अशीही पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.

या रस्त्यावर वेगवेगळ्या झाडांची दुतर्फा दाट सावली व वैभव आहेच; शिवाय २५ प्रकारच्या अस्सल देशी झाडांचे अस्तित्व या रस्त्यावर वर्षानुवर्षे टिकून आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर साडेतीनशे झाडे असल्याचे यंत्रणेकडून सांगितले जात असले; तरी प्रत्यक्षात सर्व झाडांची संख्या साडेपाचशेपेक्षा जास्त असू शकते, अशीही माहिती समोर येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्यावर वडाचे ७१ वृक्ष, कडुलिंबाचे २२५ वृक्ष, शिसमचे ५० वृक्ष, महारुख ४०, तर काशिदचे ४० वृक्ष आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे ही झाडे तोडली तर या रस्त्यावरील संपूर्ण देशी वृक्षसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरे म्हणजे इतर अनेक पर्यायांचा विचार करण्याची गरज पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. या विषयी पर्यावरणप्रेमी कमल पहाडे म्हणाले, ‘नाशिक परिसरात अशी कितीतरी शेकडो जुनी झाडे वाचवून बाजुने रस्ते तयार करण्यात आले आहेत. यामुळे काही प्रमाणात खर्च वाढू शकतो; परंतु अस्सल देशी वनसंपदा वाचवली जाऊ शकते.’ Actually slaughter more than 550 trees? Allegation of giving wrong figures by the system

ML/ML/PGB
13 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *