रायगडची रोपवे सेवा पुन्हा सुरु

महाड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड येथील रायगड किल्ल्यावर रविवार ७ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी १० जुलै पर्यंत रोपवे बंद करण्यात आला होता, तर पायरीमार्ग २१ जुलै पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. हा रोपवे गुरुवार दिनांक ११ जुलै पासून सुरु करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतो आहे. ७ आणि ८जुलैला रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात अतिवृष्टी झाली होती. यावेळी रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. त्यामुळे रोपवे आणि पायरी मार्ग बंद करण्यात आले होते. पण रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या पाहता रोपवे सुरु करावा अशी मागणी पर्यटकांकडून सुरु झाली. त्यामुळे गुरुवार ११ जुलै पासून रोपवे सुरु कण्याचा निर्णय पुरातत्व विभागाने घेतला त्यानुसार रोपवे सुरु झाला आहे.
ML/ML/SL
12 July 2024