शेपु चिकन
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:
चिकनचे ८-१० लहान (बोनलेस) तुकडे, चमचाभर आलं-लसूण (बारीक चिरून किंवा ओबडधोबड वाटून), १ /२ छोटा कांदा बारिक चिरुन, ३-४ चमचे शेपु चिरुन, ऑलिव्ह ऑइल, चिमुटभर साखर, मीठ, व्हाइट व्हिनेगर / लिंबाचा रस, हवं असल्यास पिझ्झा सिझनींग (मी डॉमिनोज सोबत मिळणार्या सिझनींगचं अर्धं पाकिट वापरलं)
क्रमवार पाककृती:
एका फ्रायपॅनमध्ये थोडं ऑलिव्ह ऑइल घेवून त्यावर कांदा परता, कांदा किंचीतसा शिजल्यासारखा वाटला की त्यात आलं-लसूण घाला. थोडंसं (३०-४० सेकंद) परतून लगेच त्यात चिरलेला शेपु घाला. थोडं परतून त्यात चिकन घाला. चिकन परतत असतानाच त्यात मीठ, हवं असल्यास पिझ्झा सिझनींग घाला. कमी आचेवर परतत रहा. ४-५ मिनीटातच चिकन शिजेल. चिकनचा रंग बदलला (चिकन शिजलं) की त्यात अर्धा चमचा व्हिनेगर घाला. किंचीत परतून लगेच त्यात चिमुटभर साखर घाला. अर्धा-एक मिनीट परता.
शेपु चिकन तयार.
Shepu Chicken
ML/ML/PGB
10 July 2024