दिल्लीतून अवयव प्रत्यारोपणासंबंधी मोठे रॅकेट उघडकीस
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी दिल्लीमधून अवयव प्रत्यारोपणासंबंधी मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी एका डॉक्टरसह एकूण ७ जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केलं आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे.या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेले लोक बांगलादेशचे आहेत. या प्रकरणात आता पोलीस कसून चौकशी करत आहेत.अवयवदानाच्या रॅकेटमधील लोक एका प्रत्यारोपणासाठी तब्बल २५-३० लाख रुपये घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे रॅकेट २०१९ पासून सुरु असल्याचा पोलिसांना कयास असून त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.
दिल्लीचे पोलीस आयुक्त अमित गोयल यांनी या रॅकेटसंदर्भात बोलताना सांगितलं की, “या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार बांगलादेशी आहे. यामध्ये देणगीदार आणि स्वीकारणारे दोघेही बांगलादेशचे होते. या रॅकेटमधील सर्व लोकांचा बांगलादेशशी संबंध असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सहभागी असलेल्या एका महिला डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या सात जणांची चौकशी सुरु आहे”, असं अमित गोयल यांनी सांगितलं.
पोलीस आयुक्त गोयल म्हणाले, “डॉक्टर महिलेला अटक करण्यात आली आहे. त्या महिलेचे दोन ते तीन रुग्णालयाबरोबर संपर्क असून यामध्ये त्या डॉक्टर महिलेची काय भूमिका आहे? याबाबतही तपास करण्यात येणार आहे. या महिला डॉक्टरला दिल्ली पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली. मात्र, भारताच्या मानवी अवयवांचे प्रत्यारोपण कायदा (२०१४) नुसार, अवयव दानाला फक्त आई-वडील आणि भावंड यांसारख्या रक्ताच्या नात्यामध्येच परवानगी आहे. मात्र, या प्रकरणामध्ये व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून या महिला डॉक्टरांच्या मार्फत त्याचे अवयव काढले जात अशे, अशी प्राथमिक माहिती आहे.
SL/ML/SL
9 July 2024