मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला अधिकारी करतात बेदखल

 मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला अधिकारी करतात बेदखल

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्र्यानी बैठक घेऊन नवी मुंबई बाबत दिलेल्या आदेशाला खालचे अधिकारी पाच पैशाची किंमत देत नाहीत , सिडको आणि पालिकेत काही अधिकारी दलाल म्हणून वावरतात असा थेट आरोप आज सत्तारूढ सदस्य असलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात केल्यावर सरकारकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न झाला आणि लवकरच बैठक बोलावून अंतिम निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली.

गणेश नाईक यांनी सभागृहात नवी मुंबई महापालिकेसाठी आवश्यक असणारे भूखंड सिडकोने परस्पर विकले असल्याबाबतची लक्ष वेधी सूचना उपस्थित केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत अकरा महिन्यांपूर्वी या विक्रीला स्थगिती देत शिंदे यांनी सिडको आणि पालिका अधिकारी यांना एकत्रित बसवून नगरविकास सचिवांनी त्यात तोडगा काढावा अशा सूचना केल्या होत्या असे. सभागृहात सांगितले.

यावर आपण गेले अकरा महिने सातत्याने पाठपुरावा करूनही काही सिडको आणि पालिका अधिकारी दलाल्या करीत नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करीत आहेत असा थेट आरोप केला, सरकारने यावर भूमिका स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला अधिकारी मानत नाहीत असा त्याचा झालेला अर्थ स्पष्ट करावा अशी मागणी केली. प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश स्थागितीचेच आहेत, या प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.Officers are evicting the Chief Minister’s orders

ML/ML/PGB
3 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *