पुण्यात होतोय झिका विषाणूचा प्रसार

 पुण्यात होतोय झिका विषाणूचा प्रसार

पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यामध्ये झिका विषाणूचा प्रसार होताना दिसत आहे. शहरात संसर्गाचे 6 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये दोन गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे भागातील २८ वर्षीय गर्भवती महिलेमध्ये झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आणखी 12 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. सध्या दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर आहे.

शहरात गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. आतापर्यंत ‘झिका’च्या संसर्गाचे निदान होणाऱ्या रुग्णांमधील गर्भवतींची संख्या दोन झाली आहे. या दोन्ही गर्भवती एरंडवणे परिसरातील रहिवासी आहेत. रोगनिदान झालेल्या रुग्णांनी देशात किंवा परदेशात प्रवासाचा इतिहास नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

ML/ML/SL

2 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *