आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना पूर्ण प्रतिनिधित्व देण्याची मागणी

 आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना पूर्ण प्रतिनिधित्व देण्याची मागणी

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेले नाही, महाराष्ट्रातील मुस्लिमांनी काँग्रेस-सेना (उबाठा )आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना पूर्ण एकजुटीने मतदान केले. तसेच पुरेसे निकाल देखील आले. ते पक्षांनी स्वीकारले आहे. मीडियाने मुस्लिमांवर एकतर्फी मतदानाचा आरोपही केला. आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने या धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांना पूर्ण प्रतिनिधित्व द्यावे अशी
मागणी ऑल इंडिया उलामा बोर्ड ने प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला ऑल इंडिया उलामा बोर्डचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मौलाना नौशाद अहमद सिद्दीकी , अल्लामा बुनई हसनी, सलीम अलवारे, मौलाना शमीम अख्तर नदवी, डॉ अब्दुल कादिर सय्यद, मौलाना नियाज उद्दीन नदवी, मौलाना सबित अली नक्शबंदी, डॉ नदीम उस्मानी, मुबीन सिद्दीकी (औरंगाबाद )उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने या धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांना पूर्ण प्रतिनिधित्व द्यावे अशी मुस्लिमांची इच्छा आहे.या संदर्भात उलेमा मंडळाने इतर सामाजिक संघटनांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील आणि मोठ्या शहरांमधील विधानसभा मतदारसंघांचे निरीक्षण सुरू केले आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांची लोकसंख्या अकरा टक्के आहे, त्यामुळे त्यांना किमान 30 विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व दिले पाहिजे जेणेकरून अधिकाधिक पात्र मुस्लिम विधानसभेत पोहोचू शकतील, त्यासाठी राजकीय नेत्यांवर दबाव टाकणे हे फार महत्वाचे आहे. आमच्या मागण्यांबाबत नेते ,मंत्री यांना आम्ही निवेदन देणार आहेत.

महाराष्ट्रात आम्ही आमच्या बांधवाची संवाद साधणार आहोत. भाजपा आम्हाला तिकट देत नाही .त्यामुळे आम्ही भाजपाकडे जाणार नाही. या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. इंडिया ब्लॉक आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.असे अल्लामा बुनई हसनी तसेच इतर मान्यवरांनी पत्रकार परिषेदेत सांगितले.

Demand for full representation of Muslims in the upcoming assembly elections

ML/ML/PGB
1 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *