भारताने जिंकला T20 वर्ल्ड कप, 7 धावांनी सनसनाटी विजय

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत ICC T20 विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरून इतिहास घडवला. एका टप्प्यावर पराभूत होताना दिसत असतानाही हार्दिक पांड्याने हेन्रिक क्लासेनला बाद केल्याने आणि सूर्यकुमार यादवचा खेळ बदलून टाकणारा झेल टीम इंडियाच्या बाजूने फिरला. त्यानंतर गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. 177 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य असतानाही भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 8 बाद 169 धावांवर रोखले.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.
India won the T20 World Cup, a sensational victory by 7 runs
ML/ML/PGB
29 Jun 2024