संतश्रेष्ठ माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

पुणे, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला . माऊलींच्या पालखीचे हे १९३ वे वर्ष आहे. इंद्रायणी काठावर यानिमित्ताने लाखो वैष्णवांचा मेळा भरला होता. अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीत दाखल झाले असून टाळ मृदंगाच्या गजरात ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात वारकरी तल्लीन झाल्याचे बघायला मिळाले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आळंदीत दाखल झाले होते. त्यांनी माऊलींचे दर्शन घेतले.
यावेळी शिंदे यांना फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत फुगडी खेळली. यावेळी बारणे यांनी एकनाथ शिंदे यांना वाकून नमस्कार केला. शिंदे यांनीही बारणेंच्या पाठीवर थाप देत आशीर्वाद दिला The palanquin of Saint Shrestha Mauli is on its way to Pandharpur
ML/ML/PGB
29 Jun 2024