सर्वसामान्य नागरिकांसाठी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध तीर्थक्षेत्र आणि चारधाम यात्रेसाठी राज्य सरकार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आखून यात्रेकरूंना अनुदान देईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरच्या लक्ष वेधी सूचनेच्या उत्तरात दिली. यासाठी नियमावली केली जाईल , इच्छा असूनही पैशाअभावी यात्रेला जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन नोंदणी केली जाईल, त्यांना नेमके किती अनुदान द्यायचे ते ठरविले जाईल असंही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलं. याबाबतची लक्ष वेधी सूचना प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केली होती, त्यावर राम कदम , देवयानी फरांदे , मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, हरीश पिंपळे आदींनी याबाबत आग्रही मागणी केली होती.
धोकादायक कारखान्यांचा वेगळा झोन
नागपूर परिसरात असणाऱ्या स्फोटके बनविणाऱ्या कारखान्यांपैकी ४७ कारखाने धोकादायक पदार्थ बनवीत असल्याने त्यांचा स्वतंत्र झोन स्थापन करण्याचा प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवला आहे अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी याबाबतच्या लक्ष वेधी सूचनेवर उत्तर देताना दिली. ही सूचना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केली होती, त्यावर नाना पटोले, अनिल देशमुख , अस्लम शेख आदींनी उपप्रश्र्न विचारले. यावरच्या उप प्रश्न विचारताना मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरून विरोधक संतप्त झाले आणि त्यांनी निषेधार्थ सभात्याग केला.
ML/ML/SL
29 June 2024