दाओसमध्ये झालेल्या सामंजस्य कराराची येणार श्वेतपत्रिका
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या तीन वर्षांत दाओसला झालेले सामंजस्य करार आणि त्याची झालेली अंमलबजावणी याची वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका काढण्यात येईल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत केली. शेंद्रा बीडकीन औद्योगिक पट्ट्यात जागतिक दर्जाच्या औद्योगिक सुविधा मिळत नसल्याचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला, त्या अनुषंगानं सामंत उत्तर देत होते.
तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना दाओसला ८० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं मात्र त्यातील सर्वात मोठा ऊर्जा विभागाचा करणारच सापडत नाही याकडे सामंत यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. हुंदाई कंपनी महाराष्ट्रात चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
ML/ML/SL
29 June 2024