समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू…

जालना, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या एर्टिगा कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने अपघात होऊन त्यात सात जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली,
नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या एर्टीगा कार मध्ये डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर एर्टीगा कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती आहे.
रात्री अकराच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रं. MH.12.MF.1856 मध्ये डिझेल भरल्या नंतर विरुद्ध दिशेने या कारणे नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या एर्टीगा कार क्रं. MH.47.BP .5478 ला जोरदार धडक दिली. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला असून यात सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला, तर चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारसाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलय. सदर घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेन साह्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
ML/ML/SL
29 June 2024