कसोटी सामन्यात शेफाली वर्माचे विक्रमी द्विशतक

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चेन्नईच्या चेपॉकवर भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची सलामीवीर शेफाली वर्माने ऐतिहासिक कामगिरी करत द्विशतक झळकावले आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान डबल सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड शेफाली वर्मानं . शेफालीनं १९४ बॉलमध्येच डबल सेंच्युरी पूर्ण केली.
आज भारताने ९८ षटकात ४ बाद ५२५ धावा ठोकल्या. भारताकडून शेफाली वर्माने द्विशतक तर स्मृती मानधनाने शतक केले. भारतीय महिला क्रिकेटपटूने २२ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर द्विशतक झळकावले आहे. शेफालीपूर्वी हे काम भारताची माजी कर्णधार मिताली राजने केले होते. मितालीने २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावले होते आणि २१४ धावांची इनिंग खेळली होती.
मात्र, द्विशतक झळकावल्यानंतर शेफाली फार काळ टिकू शकली नाही. जेमिमाह रॉड्रिग्ससोबत धाव घेताना तिने तिची विकेट गमावली. शेफालीने १९७ चेंडूंचा सामना करत २३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने २०५ धावा केल्या. या सामन्यात शेफालीला तिची सलामीची जोडीदार स्मृती मानधनाने साथ दिली. मंधानाने १६१ चेंडूत १४९ धावांची खेळी केली. या खेळीत तिने २७ चौकार आणि १ षटकार लगावला. शेफाली आणि मानधनाने पहिल्या विकेटसाठी २९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. शेफाली आणि मंधाना यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा पाकिस्तानचा २० वर्ष जुना विक्रमही मोडला.
भारतीय महिला टीमनं पहिल्याच दिवशी 500 रनचा टप्पा पार करत आफ्रिकेवर वर्चस्व गाजवलं. शेफालीनं 197 बॉलमध्ये 205 रन केले. या खेळीत तिनं 23 फोर आणि 8 सिक्स लगावले. शफालीला स्मृती मंधानानं 149 रन काढत भक्कम साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 292 रनची भागिदारी केली. महिला टेस्ट क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागिदारी आहे.
SL/ML/SL
28 June 2024