अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी अशा आहेत तरतुदी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेल्या या अर्थसंकल्पात राज्यासाठी महत्वाच्या विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.
मुलींना शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क माफ
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेल्या या अर्थसंकल्पात मुलींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसंच कृषीविषयक अभ्यासाच्या प्रवेशासाठी 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 2 लाख 5 हजार मुलींना होणार असून 2024-25 पासून ही योजना सुरू होत आहे.
सरकार वारकऱ्यांना प्रति दिंडी २० हजार रूपये देणार
सरकारने लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून प्रति दिंडी २० हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा अजित पवार यांनी बजेट सादर करताना केली.
३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी निर्मल वारीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. देहू – आळंदी मार्गावरील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार मुख्यमंत्री सहायता कक्षाद्वारे केले जाणार आहेत. वारकरी, भजनी मंडळ यांना सोयी सुविधा देण्यासाठी, पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी वारकरी व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले.
AI संशोधनासाठी सरकार विद्यापीठांना देणार १०० कोटींचा निधी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. AI संशोधनासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या संशोधावर भर देण्यासाठी सरकार विद्यापीठांना १०० कोटींचा निधी देणार आहे. अजित पवार यांनी ही घोषणा केली.पवारांच्या या घोषणेनंतर आता राज्यातील विद्यापीठांमध्ये एआयवर आधारित अभ्यासक्रमही तयार केले जाऊ शकतात.
पेट्रोल – डिझेलचे दर कमी होणार, मुंबईसह 3 शहरात ‘टॅक्स’ कमी करणार, पवारांची घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिक व प्रवाशांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता सवलत मिळणार आहे. कारण, राज्य सरकारच्या निर्णयामुळे या तिन्ही जिल्ह्याच्या क्षेत्रात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होणार आहेत. ग्राहकांना पेट्रोलमध्ये प्रति लिटर 65 पैसे, तर डिझेलमध्ये प्रति लिटर 2.7 पैसे रुपये कमी होणार आहेत.
आरोग्यासाठी योजना
राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रूपये
गरोदर माता- मुलांना रूग्णालयात नेण्यासाठी मोफत ३ हजार ३२४ रूग्णवाहिका उपलब्ध
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबाना लाभ मिळणार
आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम आता ५ लाख रूपये
१ हजार ९०० रूग्णालयांमार्फत १ हजार ३५६ प्रकारचे उपचार उपलब्ध असणार
शेतकऱ्यांसाठी महत्वाचे
येत्या दोन वर्षात 163 सिंचन प्रकल्प पूर्ण होणार
सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून 15000 कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर,
3200 कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहोचवणार,
शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करण्यासाठी 15000 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येणार
कृषी विभाग
राज्यात गाव तिथे गोदाम योजनेसाठी 331 कोटींची तरतूद
कापूस, सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5000 रुपयांच्या अर्थसहाय्य
गाईच्या दुधासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान
राज्यभर ई पंचनामा योजना राबवणार
१ रूपयात पिकविमा देण्याची योजना कायम
राज्यातील पडीक जमिनीवर बांबू लागवड
मागेल त्याला सौर पंप योजनेतून शेतकऱ्यांना मोफत वीज मिळण्यासाठी प्रयत्न
जलयुक्त शिवार अभियान 2 राबवले जाणार
महाराष्ट्रात सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेणार
सांगली येथे सौर उर्जा प्रकल्प सुरू होणार
पशुधन हानी नुकसान भरपाईत वाढ
मत्स्य बाजार स्थापन केले जाणार
बांबूची लागवड केली जाणार
प्रती रोपाकरता १७५ रूपये अनुदान म्हणून दिले जाणार
ML/ML/PGB 28 Jun 2024