हरणांचा वावर वाढल्याने शेतकरी त्रस्त; पिकाची नासाडी

 हरणांचा वावर वाढल्याने शेतकरी त्रस्त; पिकाची नासाडी

बीड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) जिल्ह्यातील मगरवाडी शिवारात हरणांचा वावर वाढला असून या हरणाकडून शेतातील पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला असून हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी शिवारात हरणांचा वावर वाढला आहे. हरणांचे कळप पेरणी झालेल्या शेतामध्ये दिवसभर आपले ठाण मांडून आहेत. गेल्या आठवड्यापूर्वीच शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग इत्यादी पिकाची पेरणी केली आहे. भरपूर ओल असल्याकारणाने बियाण्याची चांगल्या प्रकारे उगवण झाली आहे. मात्र अन्नाच्या शोधत असलेल्या हरणाचे कळप शेतात फिरत असल्याने पिकाचे नुकसान होत असल्याने हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

ML/ML/SL

28 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *