कंदवड्या

 कंदवड्या

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

– पाव किलो चण्याची डाळ
– एक गड्डा लसूण सोलून
– किती तिखट हवंय त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या (वड्या वाळून तिखट पणा कमी होतो, आणि जरा तिखट या चांगल्या लागतात सो त्या प्रमाणात मिरच्या घेतल्या तर बरं. तरी प्रमाण म्हणून १०-१२ तरी हव्यात)
– मीठ चवीनुसार
– थोडं जिरं
– दोन तीन चिमटीभरून चांगला हिंग
– २ मोठे चमचे तीळ

क्रमवार पाककृती: 

– डाळ स्वच्छ धूवून भिजत घालावी
– चांगली भिजली की तीळ सोडून इतर सर्व साहित्य घालून जाडसर वाटावी
– ३-४ मिनिटं हातानी चांगली फेसावी अनि मग तीळ घालून जरा चपट्या कॉईन च्या आकारात वड्या घालून उन्हात खडखडीत वाळवाव्यात.
– वाळल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात
– खायच्या वेळी तेलात मंद आचेवर तळून मग गरमच खायला घ्याव्यात.

ML/ML/PGB
27 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *