महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जागा अखेर मुंबई मनपाच्या ताब्यात
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली महालक्ष्मी येथील रेसकोर्सची १२० एकर जागा अखेर मुंबई पालिकेच्या ताब्यात आली आहे. या जागेवर आता मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क,उद्यान आणि मोकळी जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या एकूण २११ एकर जागेपैकी १२० एकर जागा राज्य सरकारच्या मंजुरीनंतर पालिकेच्या ताब्यात आली आहे,अशी माहिती पालिका आयुक्त डॉ.भूषण गगराणी यांनी दिली.
आयुक्त डॉ.भूषण गगराणी यांनी सांगितले की,दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली महालक्ष्मी येथील रेसकोर्सची एकूण २११ एकर जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लवला १९१४ साली भाडे करारावर देण्यात आली. हा भाडे करार २०१३ मध्ये संपुष्टात आला.यानंतर करार वाढवला नसल्याने ही मुदत संपल्यानंतर या जागेपैकी १२० एकर जागा राज्य सरकारमार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर उर्वरित ९१ एकर जागा आरडब्ल्यूआयटीसीला भाडेपट्टय़ाने देण्यात येणार आहे. याठिकाणी सेंट्रल पार्क,उद्यान आणि मोकळी जागा उपलब्ध होणार आहे.
SL/ML/SL
26 June 2024