द. अमेरिकेतील या देशात पाण्यापेक्षा पेट्रोल स्वस्त

काराकास, व्हेनेझुएला, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वांत मोठा तेलसाठा असलेला विकसनशील देश म्हणून ओळखल्या जाणार्या व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल- डिझेलचा दर हा पाण्यापेक्षाही कमी आहे.या देशात पेट्रोल खूप स्वस्त असले तरी खाद्यपदार्थांच्या प्रचंड किमतीने येथील नागरिक हैराण झाले आहेत.
व्हेनेझुएलामध्ये खाद्यपदार्थांचे दर जास्त असले तरी पेट्रोल खूपच स्वस्त आहे. व्हेनेझुएलामध्ये जगातील एकूण कच्च्या साठ्यापैकी १८ टक्क्यांहून अधिक साठा आहे. यामुळे व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलच्या किमती खूपच कमी आहेत. या देशात एक लिटर पेट्रोलचा दर २ रुपयांपेक्षा कमी आहे. गाडीची १० लिटरची पेट्रोल टाकी भरण्यासाठी त्या ठिकाणी नागरिकांना केवळ १६ ते १७ रुपये मोजावे लागतात.एक काळ असा होता की, व्हेनेझुएलाची गणना श्रीमंत देशांमध्ये व्हायची. मात्र,आता परिस्थिती खूपच बदलली आहे.
जागतिक सांख्यिकीय आकडेवारीनुसार, व्हेनेझुएलामध्ये महागाईचा दर ३१८ टक्के आहे.त्यामुळे खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रचंड महाग आहेत. परिणामी, गरिब नागरिकांना उपाशी झोपावे लागत आहे. व्हेनेझुएलाप्रमाणेच उत्तर आफ्रिकन देश लिबियामध्ये पेट्रोलचे दर खूप कमी आहेत.या देशात एक लिटर पेट्रोलचा दर ३ रुपयांपेक्षा कमी आहे.
SL/ML/SL
25 June 2024