फ्लॉवर बटाटा नारळाच्या दुधातली भाजी

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
फ्लॉवर, बटाटा, आलं- हि. मिरची- कोथिंबीर ठेचा, नारळाचं दूध, मीठ, साखर, वरुन घालायला कोथिंबीर, फोडणीकरता तेल, हिंग, हळद, जिरं, मोहरी, कढिपत्ता.
क्रमवार पाककृती:
फ्लॉवरचे तुरे काढून पाण्यात घालून ठेवावेत, बटाटेही जरा मोठ्या फोडी करुन फ्लॉवरबरोबरच पाण्यात घालून ठेवाव्यात. हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर ह्याचा ठेचा करुन ठेवावा.
तेल गरम करुन त्यात जिरं, मोहरी घालून तडतडल्यावर हिंग, हळद घालून घ्यावी. वर कढिपत्ता घालावा. एकीकडे फ्लॉवर, बटाटा चाळणीवर निथळून घ्यावं आणि ते फोडणीत घालून परतावं. त्यावर ठेचा घालून परतून घ्यावा. मग त्यावर फ्लॉवर बटाटा बुडेपर्यंत नारळाचं दूध घालून झाकण घालून चांगलं मऊ शिजू द्यावं. (झाकण पूर्ण बंद करु नये. थोडी गॅप ठेवावी नाहीतर भाजी उतू जाते). शिजल्यावर मीठ, साखर, कोथिंबीर घालून पोळी/फुलक्याबरोबर खावी.
Flower Potato Vegetables in Coconut Milk
ML/ML/PGB
25 Jun 2024