भारताचे ‘सिटी ऑफ लिटरेचर’ म्हणून कोझिकोडला मिळाला मान, युनेस्कोने केले जाहीर
भारताचे पहिले ‘सिटी ऑफ लिटरेचर’ उत्तर केरळमधील कोझिकोडला या शहराला घोषित करण्यात आले. समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहराला युनिस्कोने बहुमान देत तसे रविवारी जाहीर केले. युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या (यूसीसीएन) ‘साहित्य’ श्रेणीत ऑक्टोबर २०२३ मध्ये कोझिकोडला स्थान मिळाले होते. दरम्यान केरळ राज्याचे स्थानिक स्वराज्य संस्था विभागाचे मंत्री एम. बी. राजेश यांनी रविवारी केरळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात कोझिकोडच्या यशाची घोषणा केली. कोलकात्यासारख्या समृद्ध सांस्कृतिक इतिहास असलेल्या शहरांना मागे टाकत युनेस्कोकडून ‘सिटी ऑफ लिटरेचर’चा दर्जा मिळविण्यात कोझिकोड महानगरपालिकेच्या कारभाराचा मोठा वाटा आहे. कोझिकोडचा येत्या वर्षापासून २३ जून हा दिवस ‘साहित्यनगरी’ दिन म्हणून साजरा केला जाईल, असेही राज्य सरकारने जाहीर केले. या दिवशी सहा श्रेणींमध्ये विशेष पुरस्कारांची घोषणा केली जाईल. भारतातील ग्वाल्हेर आणि कोझिकोड ही ५५ नवीन शहरे यूसीसीएनमध्ये सामील झाली आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी येणाऱ्या जागतिक शहर दिनानिमित्त ही नवी यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.