आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजपाने आठ ते दहा जागा द्याव्यात*

 आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजपाने आठ ते दहा जागा द्याव्यात*

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजप आणि महायुतीमधून आठ ते दहा जागा सोडण्यात याव्यात, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद व एक विधान परिषद देण्यात येऊन सत्तेत वाटा मिळावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
अंधेरी येथे पत्रकार वार्तालाप आयोजित करण्यात आला होता त्यावेळी रामदास आठवले यांनी विविध प्रश्नंवर आढावा घेताना रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राज्यात काँग्रेस आणि विरोधी पक्षाने संविधान बदलाची भीती दाखवून दलित समाजाची मते वळवण्यात यश मिळवले असले तरी ही सर्व मते भाजपकडे आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे, त्यासाठी दिल्लीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपली भेट झाली त्यामध्ये चर्चाही झाल्याचे आठवले यांनी सांगितले. संविधान जनजागृती यात्रा संपूर्ण देशभर राबवून जनजागृती केल्यानेच मागच्या वेळी एनडीए आणि भाजपाला यश मिळाले ,याची आठवण आठवले यांनी करून दिली. रिपब्लिकन पक्षांमध्ये दलितच नव्हे तर अन्य आघाडी मार्फत समाजामध्ये रिपब्लिकन पक्षाने कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले आहे. कार्यकर्त्यांचा मोठी फळी असणारा आपला रिपब्लिकन पक्ष आहे. रिपब्लिकन ऐक्यमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व केल्यास त्याचे आपण स्वागत करू, रिपब्लिकन नेत्याचे ऐक्य होत नसेल तर आंबेडकरी जनतेने एकेक करून आपली मतदानातून ताकद दाखवली पाहिजे, असंही आठवल्याने सांगितले. यावेळी गौतम सोनवणे, सुरेश बारशिंगे, श्रीकांत भालेराव, पप्पू कागदे, चंद्रशेखर कांबळे ,प्रकाश जाधव आदी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. BJP should give 8 to 10 seats to the Republican Party in the upcoming assembly elections*

ML/ML/PGB
23 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *