ओबीसी आरक्षण आंदोलन तात्पुरते स्थगित

 ओबीसी आरक्षण आंदोलन तात्पुरते स्थगित

जालना, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वडीगोद्री इथले लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी केलेले उपोषण आंदोलन आज तात्पुरते स्थगित केले आहे. काल मुंबईत झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांच्यास १२ जणांचा समावेश होता. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

ओबीसी आंदोलनकर्त्याच्या एक- दोन मागण्या सोडल्या तर बाकी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. त्यानंतर हाके यांनी शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पीत उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मागील दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी हाके यांच्याकडून करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना हाके म्हणाले, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आम्ही आंदोलन स्थगित केले, थांबवले नाही. आमच्या दोन मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. आम्ही आक्षेप घेतलेल्या हरकतींची श्वेतपत्रिका काढावी. तसेच सगे सोयऱ्यांचे आरक्षण देणार नाही असे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र वेळोवेळी आंदोलनाची दिशा ठरवत राहू”, असे हाके म्हणाले. दरम्यान, हे शिष्टमंडळ दाखल होताच उपोषणस्थळी एकच गर्दी उसळली. या शिष्टमंडळाला घेराव घालण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

लक्ष्मण हाके यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. ओबीसी नेत्यांसोबत काल राज्य सरकारसोबत बैठक झाली होती. दरम्यान, आज शिष्टमंडळ दाखल होताच उपोषणस्थळी एकच गर्दी उसळली. या शिष्टमंडळाला घेराव घालण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. OBC Reservation Movement Suspended Temporarily

ML/ML/PGB
22 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *