या फ्रेंच पत्रकाराला सोडावा लागणार भारत
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारने एका फ्रेंच पत्रकाराच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याला देश सोडवा लागणार आहे. सॅबेस्टियन फार्सीस असे या फ्रेंच पत्रकाराचे नाव आहे. सॅबेस्टियन हे रेडिओ फ्रान्स इंटरनॅशनल तसेच युरोपातील आणखी काही देशांतील रेडिओंचे दक्षिण आशिया प्रतिनिधी होते.
सॅबेस्टियन यांनी म्हटले आहे की,गेली १३ वर्षे मी या देशात पत्रकार म्हणून काम केले आहे. परंतु मला भारत सोडण्यास भाग पाडण्यात आले आहे. भारतीय दुतावासाने आपला पत्रकार म्हणून काम करण्याचा परवाना नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आपल्याला नाईलाजाने भारतातून जावे लागत आहे. यासाठी कुठलेही कारण देण्यात आलेले नाही. मी गृहमंत्रालयाकडे अनेकदा विनंती केली. परंतु माझे प्रयत्न व्यर्थ ठरले. चार महिन्यांपूर्वी फ्रेंच पत्रकार वॅनेसा डॉग्नॅक आणि अवनी डायस यांना देखील परवाना नूतनीकरणास दुतावासाने नकार दिल्याने दोन महिन्यांपूर्वी भारतातून निघून जावे लागले होते.
SL/ML/SL
21 June 2024