लोणावळा शहरात दिवसा जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी
लोणावळा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोणावळा शहरामधून जाणाऱ्या जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेमध्ये अवजड वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काढले आहेत. त्यामुळे आता लोणावळ्यात अवजड वाहनांना फक्त रात्री प्रवेश मिळणार आहे.
लोणावळा शहरातून जुन्या मुंबई- पुणे महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. परिणामी लोणावळा शहरामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असते. शिवाय अपघाताचे प्रमाणदेखील मागील काही दिवसांत वाढले आहे. शहरातील वाहतूक कोंडी व अपघाताच्या समस्या लक्षात घेता सुहास दिवसे यांनी हा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीमध्ये सर्व प्रकारची जड व अवजड वाहने लोणावळा शहरातून नेण्यास बंदी असेल. ही वाहने मनशक्ती येथून मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वळवण्यात येणार आहेत. खंडाळ्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांनादेखील बंदी घालण्यात आली.
ML/ML/SL
19 June 2024