गुगलचे जेमिनी मोबाईल App, मराठीतही होणार सगळी कामं
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गुगलचे सीईओ सुंदर पिचाई भारतात जेमिनी मोबाईल ॲप लाँच करत आहेत. हे गुगलचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितल्याप्रमाणे, हे ॲप इंग्रजी, मराठीसह हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. प्रत्येकाला आपापल्या भाषेनुसार AI मदत करणार आहे. Gemini Advanced मध्ये या स्थानिक भाषांना जोडले जाणार आहे. यातील नवीन फीचर्समध्ये, डेटा विश्लेषण, फाईल अपलोड असे फीचर्स तर गूगल मेसेजमध्ये जेमिनी बरोबर इंग्रजीमध्ये चॅट करण्याची सुविधा दिली जाणार आहे. इतकंच नाही तर, एखादी रेसिपी करायची असेल, सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी कॅप्शन हवं असेल तेव्हा हा ॲप तुम्हाला टाइप करण्यासाठई, बोलण्यासाठी किंवा इमेज जोडण्यासाठी परवानगी देईल. Android वर जेमिनी ॲक्सेस तुम्ही मिळवू शकता.
ML/ML/PGB 17 Jun 2024