प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना ऐकू येईना, दुर्मिळ आजाराने त्रस्त

 प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना ऐकू येईना, दुर्मिळ आजाराने त्रस्त

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक या सध्या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम झाला असून त्यांना ऐकू येत नसल्याचे निदान झाले आहे. नी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली. त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. अलका यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट लिहीत माहिती दिली की, काही आठवड्यांपूर्वी मी विमानातून बाहेर येत असताना जाणवलं की मला काहीही ऐकू येत नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात मी माझे कार्यक्रम रद्द केले. पण काही आठवड्यांत थोडी हिंमत एकवटल्यानंतर मी या विषयावर बोलायचं ठरवलं. डॉक्टरांनी मला दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉसचे निदान केले आहे.

हे एका व्हायरल अटॅकमुळे झालं आहे. अचानक घडलेल्या या गोष्टीमुळे मला मोठा धक्का बसला आहे. मी त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे कृपया तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा.” तसेच आपले सहकलाकार आणि चाहत्यांना त्यांनी मोठ्या आवाजातील म्युझिकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. Famous singer Alka Yagnik suffers from hearing loss, a rare disease

ML/ML/PGB
18 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *