पेणचे ७ हजार गणपती बाप्पा समुद्रमार्गे परदेशात रवाना.
अलिबाग दि १७ —
गणेशोत्सवासाठी परदेशी अनिवासी भारतीयांकडून रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पेणमधील आकर्षक गणेशमूर्तींची दरवर्षी मागणी असते. या वर्षीही सुमारे १० हजार गणेशमूर्तीची मागणी असून आतापर्यंत ७ हजार मूर्ती समुद्रमार्गे विविध देशांत पाठविण्यात आल्या आहेत.
नुकतीच तीन हजार गणेशमूर्तीची ऑर्डर पेणच्या कृष्णा कला, पेण केंद्रातून ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, दुबई, कॅनडा, युएसए , लंडन, मलेशिया , साऊथ आफ्रिका या देशांत रवाना झाली आहेत.
जानेवारी पासून जुलै पर्यंत जेएनपीटी बंदरातून ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, दुबई, कॅनडा, युएसए, लंडन, मलेशिया, साऊथ आफ्रिकाकडे रवाना देखील झाल्याचे गणेश मूर्तिकार मंगेश पवार यांनी सांगितले.
सर्वात जास्त मागणी असलेल्या एक फूट ते पाच फूट उंचीच्या गणेशमूर्ती पाठविण्यात आल्या आहेत. “जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे या बाप्पांच्या मूर्तीना पोहोचण्यासाठी साधारपणे महिन्याचा कालावधी लागतो.
७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, दुबई, कॅनडा, युएसए, लंडन, मलेशिया, साऊथ आफ्रिका या देशांतील अनिवासी भारतीयांकडून मोठी मागणी होती.
ML/ML/PGB 17 Jun 2024