आंबूसघार्या
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
२ वाट्या उरलेला शिळा भात(नरमसर असेल तर उत्तम),
१ वाटी कणीक(हि जाडसर असेल तर उत्तम),
१/२ वाटी रवाळ बेसन,
१ चमचा घट्ट बर्यापैकी आंबट दही,
४ चमचे पातळ ताक,
११/२ चमचा बडीशेप,१ चमचा धणे, १/२ चमचा जीरे, १/४ चमचा ओवा. हे जरासे खमंग परतून भरड वाटावे मग चिमटीभर हिंग(न भाजता) टाकावे.
भरपूर बरीक चिरलेली कोरडी केलेली कोथींबीर,
हवेच असेल तर गरम मसाला नाहीतर धानसाक मसाला,
मिठ,
आदल्या दिवशीचा भात खूप कोरडा व मोकळा असेल तर दाबून मळून घ्यावा. मग खूप कोरडा वाटलाच तर त्यात किंचित पाणी शिंपडून मायक्रोवेव मध्ये २ मिनीटे वाफवावा. आता त्यात दही घालून मळावं. मग त्यात कणी़क, बेसन, वरील मसाले,मिठ घालून घट्ट गोळा करून पातेल्यात ठेवण्याआधी खाली दोन चमचे ताक मग गोळा त्यावर मग त्यावर उरलेले ताक असे करून झाकून रात्रभर ठेवावा. पिठ बर्यापैकी फसफसेल सकाळी. ते पुन्हा मळावे व जर गरज असेल तरच जराशीच कणीक व त्याच्या निम्मे बेसन घालून मळावे. मग हलगद हलक्या हाताने कडेला पातळ व मध्ये भोक पाडून थापून तळावे. खमंग खुसखुशीत लागतात. मध्ये भोक पाडण्याने मधला भाग छान तळला जातो.
ML/ML/PGB
15 Jun 2024