पर्यटनाचं केंद्रबिंदू असलेला राऊतवाडी धबधबा प्रवाहित
कोल्हापूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा सुरू झाला की निसर्ग हा पर्यटकांना खुणावत असतो.राज्यातील अशी बरीच ठिकाणं आहेत जी पर्यटकांना पावसाळ्यात आकर्षित करीत असतात. १५० फूट उंचीवरून कोसळणारा राऊतवाडी धबधबा सततच्या पावसामुळे प्रवाहित झाला असून पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक इथं दाखल होत असतात.
राधानगरी तालुक्यातील पर्यटकांना खुणावणारा हा राऊतवाडी धबधबा कोल्हापूर पासून ५५ किमी अंतरावर आहे. तर राधानगरीपासून साडेसहा किमी अंतरावर असून हत्तीमहाल – पडळी मार्गे ह्या धबधब्याकडे जाता येते. मुसळधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून हा महाकाय धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
ML/ML/SL
14 June 2024