आईस्क्रिम मध्ये मानवी अंगठ्याचा तुकडा सापडल्याने खळबळ
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
ऑनलाईन आईस्क्रिम मागवणे एका डॉक्टर महिलेला चांगलेच महाग पडले आहे. मालाडमध्ये चक्क आईस्क्रिमच्या कोनमध्ये मानवी अंगठ्याचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी आईस्क्रिम बनवणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला असून , तो मानवी अंगठ्याचा तुकडा तपासणीसाठी न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवला आहे,अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी दिली.
मालाड पश्चिम येथील रहिवाशी असलेल्या ऑर्लेम ब्रेडन सेराओ (27) या महिला डॉक्टरने बुधवारी ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता.
ब्रेंडन सेराओ यांनी मागवलेला आईस्क्रीमचा कोन आल्यानंतर त्यांनी कव्हर उघडून तो खाण्यास सुरुवात केली. मात्र काही क्षणात त्यांना त्या आईस्क्रीमच्या कोनात तुटलेलं हाताचं बोट सापडलं. हे बोट दिड ते दोन सेंटीमीटर लांब होतं.
सेराओ हे व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांनी याबाबत तात्काळ मालाड पोलिसांत धाव घेत आपली तक्रार दाखल केली. मालाड पोलिसांनी युम्मो आईस्क्रिम कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे आणि आईस्क्रिम तपासणीसाठी पाठवली आहे. पोलिसांनी आईस्क्रिम मध्ये मिळालेल्या मानवी बोटाचा तुकडा तपासणीसाठी न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवला आहे.
पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
Excitement after finding a piece of human thumb in ice cream
ML/ML/PGB
13 Jun 2024