दुष्काळी भागात आता सोलार पंप आणि पाण्याच्या टाक्या

 दुष्काळी भागात आता सोलार पंप आणि पाण्याच्या टाक्या

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यभर पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक भागात अद्यापही पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागत असल्याने शासनाकडून अशा गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पण टँकरने पुरवठा करताना विजेच्या लपंडावामुळे टँकर भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गावात टँकर पोहचण्यासाठी उशीर होतो. अनेकवेळा दिवसभर पाण्यासाठी लोकांना वाट पहावी लागते. तर उशिराने पाणी मिळत असल्याने पाणी मिळवण्यासाठी मोठी झुंबळ उडते आणि त्यामुळे वाद विवाद होतात. यावर उपाय म्हणून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टँकर भरण्यासाठी सोलार पंप आणि साठवणुकीच्या टाक्या बसविण्याची मागणी शासनाकडे केली होती. यामुळे लोकांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पाणी मिळेल आणि पाण्याचा अपव्यय टाळता येईल असा त्यांचा आग्रह होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील पाण्याची उपलब्धता आणि पर्जन्यमान आढावा बैठक पार पडली. त्यात शासनाने महसूल मंत्री विखे पाटील यांच्या मागणीला मान्यता दिली असून,याची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्ह्याधिकारी यांना देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यामुळे दुष्काळी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, अनेक गावांत विजेची समस्या असल्याने टँकर भरताना मोठा अडथळा निर्माण होतो. यामुळे टँकर भरण्यासाठी उशीर लागतो. पाण्यासाठी लोकांना कामधंदे सोडून ताटकळत राहावे लागले. तर उशिरा पाणी मिळत असल्याने अनेक ठिकाणी पाण्यासाठी मिळविण्यासाठी झुंबडी उसळतात. वाड्यामध्ये मागे अशाच प्रकारे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे पाणी भरण्यासाठी सोलर पंप लावल्यास विजेचा त्रास कमी होईल आणि टँकर वेळेत भरून गावगाड्यात जातील.

तसेच साठवणीच्या टाक्या असल्याने त्यात पाण्याची साठवणूक केल्यास लोकांना नळाद्वारे आवश्यकतेनुसार पाणी घेता येईल. सध्या टँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. अनेकवेळा विहिरींचा गाळ काढला नसल्याने, साफ सफाई न झाल्याने टँकरचे पाणी दूषित होण्याची भीती असते आणि असे पाणी पिल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची होऊ शकतात पण साठवणुकीच्या टाक्यांमुळे ही समस्या सुद्धा संपुष्टात येईल आणि पाण्याचा अपव्ययही होणार नाही. असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. शासनाने मंत्री विखे पाटील यांची मागणी रास्त असून तात्काळ यावर अमलबजावणी करण्यात यावी असे सुचविले.

सदर बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत, पुर्नवसन मंत्री अनिल पाटील, मंत्री दादा भुसे, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई,राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्यासह सर्व विभागातील अपर आणि प्रधान सचिव तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.

ML/ML/SL

12 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *