तीन अल्पवयीन मुलांना हातपाय बांधून मारहाण

कोल्हापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील हडलगे गावातील तीन लहान मुलांना बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे. हडलगे गावातील पोल्ट्री चालकाने तीन लहान मुलांना हातापायांना दोरीने बांधून मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पोल्ट्री शेजारी खेळत असलेल्या मुलांमुळे काही कोंबड्या दगावल्याचा पोल्ट्री चालकाचा संशय होता. हात-पाय बांधून घातलेल्या मुलांना पोल्ट्री चालक दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या तीन लहान मुलांचे पालक नेसरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत.
ML/SL/ML/
12 June 2024