वेसावे गावातील तीन अनधिकृत इमारतींवर पालिकेचा हातोडा

 वेसावे गावातील तीन अनधिकृत इमारतींवर पालिकेचा हातोडा

मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वेसावे (वर्सोवा) येथे अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेकडून कठोर कारवाई सुरू असून वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारती पालिकेने आज हातोडा चालवला .
अति पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. वेसावे येथील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. त्यादृष्टीने कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या वतीने विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मागील आठवड्यात ३ आणि ४ जून रोजी वेसावे येथे दलदलीचा भाग आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्र (कोस्टल रेग्यूलेशन झोन) या ठिकाणची काही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली होती.

वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या तीन इमारती पालिकेकडून आज निष्कासित करण्यात आल्या. यापैकी पहिल्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर एक मजला, दुसऱ्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर तीन मजले तर तिसऱ्या इमारतीचे तळमजला आणि त्यावर तीन मजले असे स्वरुप होते. पालिकेचे १० अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी, ५० कामगार अशा मनुष्यबळासह दोन पोकलेन संयंत्र, दोन इलेक्ट्रिक ब्रेकर्स, तीन गॅस कटर्स आदी संसाधनांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

SW/ML/SL

11 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *