युरोपीय महासंघाच्या (EU) सत्ता उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या हाती

 युरोपीय महासंघाच्या (EU) सत्ता उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या हाती

ब्रुसेल, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपीय महासंघाच्या (ईयू) निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या पक्षांची सरशी झाली आहे. विविध देशांच्या सत्ताधारी सरकारांचे मोठे नुकसान झाले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाही निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षाने युरोपीय महासंघात आपल्या जागा दुप्पट केल्याने २७ सदस्यांच्या गटात सत्तेची चावी उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या हाती गेली आहे. मॅक्रॉन यांनी पराभव स्वीकारला आहे. ‘या मतदानातून मिळालेला संदेश मला समजला आहे. मुदतपूर्व निवडणुका घेणे हे केवळ त्यांची लोकशाही ओळख अधोरेखित करते,’ असे मॅक्रॉन म्हणाले. एकूणच युरोपिय महासंघामध्ये ख्रिश्चन डेमोक्रॅट्स आणि समाजवादी हे दोन मुख्य प्रवाहातील युरोपसमर्थक गट प्रबळ राहिले

यंदाच्या निवडणुकीत जर्मनीतील उजव्या विचारसरणीच्या ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ला आपल्या उमेदवारांशी संबंधित घोटाळ्याला सामोरे जावे लागले होते. चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्या ‘सोशल डेमोक्रॅट्स’ पक्षाचा पराभव झाला आहे. ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ने ११ टक्क्यांवरून १६.५ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.अतिउजव्या पक्षाच्या मरीन ली पेन यांच्या नॅशनल रॅली पक्षाचे वर्चस्व होते. त्यामुळे मॅक्रॉन यांनी तत्काळ संसद बरखास्त केली आणि मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या. मॅक्रॉन यांच्यासाठी हा मोठा राजकीय धोका आहे, कारण त्यांच्या पक्षाला अधिक नुकसान सोसावे लागू शकते. ली पेन म्हणाल्या ‘आम्ही देश बदलण्यास तयार आहोत, फ्रान्सच्या हितांचे रक्षण करण्यास तयार आहोत, सामूहिक स्थलांतराची समस्या संपविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’ मॅक्रॉन यांच्या पक्षाच्या तुलनेत त्यांच्या ली पेन यांच्या ‘नॅशनल रॅली’ पक्षाला ३० टक्क्यांहून अधिक म्हणजे दुप्पट मते मिळाली.

SL/ML/SL

11 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *