नाशिकला वायुदलाचे विमान कोसळले, पॅराशूटच्या सहाय्याने चालकाने वाचवला जीव
नाशिक, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये मंगळवारी दुपारी वायुदलाचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. वायु दलाचे हे मिग विमान नाशिकच्या पिंपळगावातील शिरसगाव परिसरात कोसळले. विमान कोसळत असताना पॅराशूटच्या मदतीने वैमानिक विमानाबाहेर आल्याने त्याचा जीव वाचला असू तो सुखरूप आहे. इतर कोणतीही जिवीतहानी झाली नाही. विमान पडल्याच्या जागी धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Trimity
4 June 2024