भरली गिलके

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. मस्तपैकी ताजे गिलके ३ ते ४,
२. शेंगदाणे भाजलेले १ लहान वाटी,
३. लसुण ४/५ पाकळ्या,
४. जिरे १/२ लहान चमचा (मिश्रणाच्या डब्यातला)
५. मिरची पुड १ टेबल स्पुन (तिखट आवडत असल्यास २ टेस्पु)
६. हळद १/२ लहान चमचा (मि.ड.) ,
७. मीठे चवीपुरतं,
८. तेल (आवडीनुसार).
क्रमवार पाककृती:
तसं बघायला गेलं तर कोकणात काय नी खानदेशात काय गिलकी/दोडकी (घोसाळे/शिराळे) हा जरा बनविण्याच्या बाबतीत सोपा आणी रिच प्रकार असतो. सकाळी लवकर जावुन बाजारातुन आणलेले ताजे ताजे गिलके बनवणे हा एक वेगळाच आनंद असतो.
तर सादर आहे, भरल्या गिलक्यांची (घोसाळे) पाककृती.
गिलके स्वच्छ धुवुन त्याचे दोन्ही टोक साधारण अर्धा इंच कापुन टाकवेत. मग त्याच्या तीन तीन इंचाच्या फोडी करुन प्रत्येक फोडीवर उभी चीर द्यावी.
भाजलेले शेंगदाणे सालं काढुन, त्यात लसुण पाकळ्या, जिरे, मिरची पुड व चवीपुरते मीठ टाकुन मिक्सरवर रवाळ वाटुन घ्यावे.
हे रवाळ वाटलेले मिश्रण गिलक्यांच्या चीर दिलेल्या फोडींमधे हलक्या हाताने व्यवस्थितरित्या दाबुन भरावे. त्यावर झाकण ठेवुन ४ ते ५ मिनीट शिजु द्यावे. नंतर त्या फोडी पलटवुन पुन्हा ३ ते ४ मिनीट शिजु द्याव्यात. थोडी शंका आल्यास मधे मधे चेक करत रहावे जेणेकरुन फोडी करपु नयेत.
भरल्या गिलक्यांची कोरडी भाजी तयार आहे.
मग ही भाजी चपाती, भाकरी, खिचडी किंवा वरणभातासोबत तोंडीलावणी म्हणुन खावी.
Bharli Gilke
ML/ML/PGB
2 Jun 2024