१० व्या मजल्यावरून उडी मारून आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोर घडली घटना

 १० व्या मजल्यावरून उडी मारून आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोर घडली घटना

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली. तिने हे टोकाचं पाऊल का उचललं याविषयी पोलिसांचा शोध सुरू आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने लिपी रस्तोगी हीने मंत्रालयासमोर असलेल्या सुनीती या इमारतीच्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. २७ वर्षीय लिपी वकिलीचं शिक्षण घेत होती. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास लिपीने उडी मारली. त्यानंतर तिला जीटी रुग्णालयात नेण्यात आले. पण तिचा जागीच मृत्यू झाला. आता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अनसैर्गिक मृत्यूची नोंद करुन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर विकास रस्तोगी कार्यरत आहेत. तर, आई राधिका या चलन विभागात सचिव आहेत. तर, ज्या इमारतीत लिपी राहायची त्याच इमारतीत आयएएस अधिकारी आणि काही मंत्री राहतात. त्यामुळे या घटनेची प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Trimity

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *