नांदेडमध्ये सापडलेले ४६ वर्षांपूर्वीचे ४३७ राऊंड …

 नांदेडमध्ये सापडलेले ४६ वर्षांपूर्वीचे ४३७ राऊंड …

नांदेड, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड शहरालगत असलेल्या पावडेवाडी शिवारातील नाल्यामध्ये शनिवारी रात्री १९७८ मध्ये बनवलेले ४३६ राऊंड म्हणजे बंदुकीच्या गोळ्या पोलिसांना सापडल्या आहेत. पाडेवाडी शिवारात राहणारा आकाश रामराव पावडे हा युवक झाडाझुडपामध्ये मध काढण्यासाठी गेला असता त्याला या बंदुकीच्या गोळ्या राऊंड दिसून आल्या. त्याने त्या घरी नेल्या. त्यावेळी पालकांनी याबाबत भाग्यनगर पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी या बंदुकीच्या गोळ्या जप्त केल्या.

या गोळ्या गंजून जीर्ण झालेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. याबाबत पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार शाखेतील तज्ञांच्या मदतीने तपासणी केली असता त्या 46 वर्षांपूर्वी तयार केलेल्या असल्याची बाब पुढे आली आहे. गंजून जीर्ण होऊन त्या निकामी झाल्या आहेत, असेही प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सदरच्या गोळ्या त्या ठिकाणी कशा आल्या याबाबत सखोल तपास करण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सहायक पोलीस अधीक्षक सी.एम. कीरितिका, दहशतवाद विरोधी पथक, डॉग स्कॉड, बीडीडीएस पथकाने पाहणी केली.

ML/ML/PGB
2 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *