ठाण्यात 5 नंबर प्लेटफार्म ला आली पहिली लोकल, मेगाबलॉक संपला
ठाणे दि २– ठाणे फलाट क्रमांक पाचचे काम पूर्ण होऊन आज पासून प्रवाशांसाठी उपलब्ध झाला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण सुरू झाले असून रेल्वे रूळ हलविण्याचे महत्वाचे कार्य पूर्ण झाले आहे. आता या फलाटाची रुंदी वाढविण्यासाठी सिमेंटच्या विटा बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे त्यानंतर या फलाटावर पहिली लोकल गाडी आली, तिचे प्रवाशांनी हार घालून स्वागत केले.
मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक पाच आणि सहा येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांना थांबा आहे. येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते. अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण करण्यास सुरूवात केली होती.
आज फलाट क्रमांक पाच वर आलेल्या पहिल्या ट्रेनचे स्वागत करण्यात आलं, प्रवाशांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून फलाटाचे सिमेंट ब्लॉक बनवायचे काम यार्डात सुरू होते, ते आता बसविण्यात आले आहेत. या वाढीव फलाटावर शेड उभारण्याचे काम आता सुरू करण्यात येईल.