महिला अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाची विदेशातून येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकातील अश्लील व्हिडीओ केस प्रकरणातील आरोपी आणि खासदार प्रज्ज्वल रेवण्णाकडून बंगळुरुच्या सेशन कोर्टात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. सध्या विदेशात असलेल्या प्रज्ज्वले रेवण्णाने भारतात येण्यापूर्वीच जामिनासाठी धडपड सुरु केली आहे. प्रज्ज्वलच्या जामिनासाठी त्याची आई भवानी रेवण्णा यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.
भारतात पोहोचताच एसआयटीकडून अटक होण्याची शक्यता
लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेला प्रज्ज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) शुक्रवारी (दि.29) बंगळुरुमध्ये दाखल होणार आहे. प्रज्ज्वलचे विमान सकाळी 8 वाजता बंगळुरू विमानतळावर दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. रेवण्णा विमानतळावर दाखल होताच तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीकडून अटक होऊ शकते.
लैंगिक अत्याचाराचे आरोप प्रज्ज्वल रेवण्णाने फेटाळले
प्रज्ज्वल रेवण्णाने 27 मे रोजी एक व्हिडीओ शूट करुन ट्वीटरवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमधून मी 31 मे रोजी भारतात परतणार असल्याचे रेवण्णाने सांगितले होते. अश्लील व्हिडीओ केस प्रकरणातही त्याने भाष्य केलं होतं. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचे म्हणत रेवण्णाने लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळले होते. मी विदेशात जाताच माझ्याविरोधात आरोप करण्यात आले. गोंधळ निर्माण करण्यात आला. 26 एप्रिलला मतदान पार पडले, तेव्हा याबाबत कोणतीही चर्चा नव्हती, असं प्रज्ज्वल रेवण्णाने म्हटलं होतं.
Prajjwal Revanna, who has been accused of abusing women, fights for bail even before he comes from abroad
ML/ML/PGB
29 May 2024