महावितरण विभागाने ट्रान्सफॉर्मरला लावले कुलर

नागपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भात सध्या सूर्य आग ओकताना दिसतोय, ज्यामुळे सामान्य नागरिक देखील उकड्यामुळे हैराण झालेला आहे. थंडावा मिळावा म्हणून नागरिक कुलर, ए सी चा आसरा घेत आहेत. अश्यात जास्त तापमानामुळे ट्रान्सफॉर्मर ला आग लागू शकते त्याकरिता उपराजधानी नागपुरातील महावितरण विभागाने पॉवर स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर ला चारही बाजूने कुलर लावून थंड ठेवण्याची योजना आखली आहे.
नागपुरात काल ४४.८ तापमानाची नोंद झाली असून आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. सूर्याच्या तापमानामुळे ट्रांसफार्मरमध्ये हिट होऊ ट्रीप शकते किंवा ट्रांसफार्मरला आगही लागू शकते. त्याकरीता महावितरण विभागाने काळजी घेत शहरातील प्रतेक सब स्टेशनवरील ट्रांसफार्मरला सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कुलर लावून थंड ठेवले जात आहेत.
ML/ML/SL
29 May 2024