मारुती कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा मृत्यू

सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील तासगाव मध्ये अल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळून भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील तासगाव – मणेराजुरी मार्गावर अल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक लहान मुलगी जखमी आहे. मयत हे तासगाव मधीलच सिव्हिल इंजिनियर राजेंद्र जगन्नाथ पाटील यांचे कुटुंबीय आहेत. अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील, पत्नी सुजाता राजेंद्र पाटील, मुलगी प्रियांका अवधूत खराडे, नात ध्रुवा, राजवी, कार्तिकी असही मृतांची नावे असून, स्वप्नाली विकास भोसले ही लहान मुलगी जखमी आहे.
ML/ML/SL
29 May 2024