ससूनच्या डॉक्टरांना अटक, आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले

 ससूनच्या डॉक्टरांना अटक, आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले

पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणी नगर प्राणांतिक अपघात प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी या दोघांना पहाटे बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर आरोपीची सकाळच्या वेळेत पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ससूनमध्ये त्यावेळी ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे ब्लड सॅम्पलच बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट बदलला गेला. थेट रक्तच बदलल्यामुळे या केसची दिशाच बदलण्याची शक्यता होती.

सुदैवाने पोलिसांनी दुसऱ्यांदा त्या मुलाचे ब्लड सॅम्पल घेऊन ठेवलेले होते आणि त्याची डीएनए चाचणी देखील करण्यात आली आहे. यातून हा सर्व प्रकार उघड झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कारवाईचे सविस्तर प्लॅनिंग केलं आणि तावरे तसेच हरनोर या दोघांना पहाटे त्यांच्या घरामधून अटक केली. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

ML/ML/SL

27 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *