परकीय चलनाच्या साठ्यात विक्रमी वाढ

 परकीय चलनाच्या साठ्यात विक्रमी वाढ

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात 17 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 4.55 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. या वाढीसह साठा 648.7 अब्ज डाॅलरच्या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहिती दिली. परकीय चलनाच्या साठ्यात सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात हा साठा 2.56 अब्ज डाॅलरने वाढून 644.15 अब्ज डाॅलर झाला होता. परकीय चलन साठ्याने 5 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात 648.56 अब्ज डाॅलरचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. 17 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यातही वाढ झाली आहे. पाकिस्तानचा चलन साठा 22 दशलक्ष डाॅलरने वाढून 9.2 अब्ज डाॅलरवर पोहोचला.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, चलन साठ्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जाणारा विदेशी चलन मालमत्ता (FCA) 17 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 3.36 अब्ज डाॅलरने वाढून 569.01 अब्ज डाॅलर झाली आहे.विदेशी चलन मालमत्तेमध्ये यूरो, पौंड आणि येन यांसारख्या बिगर अमेरिकन चलनांच्या चलनाच्या प्रभावाचा समावेश होतो. एफसीएचा वापर केवळ परकीय चलनात केलेल्या व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. याचा वापर देशांतर्गत व्यवहारांसाठी होत नाही.

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, समीक्षाधीन आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 1.24 अब्ज डाॅलरने वाढून 57.19 अब्ज डाॅलर झाले आहे. स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) 113 दशलक्ष डाॅलरने वाढून 18.17 अब्ज डाॅलर झाले. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताच्या राखीव ठेवी समीक्षाधीन आठवड्यात 168 दशलक्ष डाॅलरने घसरून 4.33 अब्ज डाॅलर झाल्या आहेत.

SL/ML/SL

26 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *