Heat Wave मुळे अनेक जिल्ह्यात कलम 144 लागू

 Heat Wave मुळे अनेक जिल्ह्यात कलम 144 लागू

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांच्या यादीत नेहमीचं अकोला , जळगाव आदी शहरांचे नाव टॉप टेन मध्ये असते.या दोन्ही जिल्ह्यात २५ ते ३१ मे पर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता दोन्ही जिल्हाधिकाऱ्यानी जिल्ह्यात ३१ मे’ पर्यंत कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू केली आहे.

काल अकोल्यात ४५.०६ अंश तापमान नोंदवण्यात आलंय तर जळगावात ही तेवढेच तापमान होते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालं आहे. दोन्ही जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ ते ४५.८ अंश सेल्सियसपर्यंत आहे. तो ४७ पर्यंत जाण्याची शक्यता आहे . उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे आणि अन्य उपाय योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे २५ मे दुपारी ४ पासून ते ३१ मेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

ML/ML/SL

26 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *