पुणे कार अपघात प्रकरणी विशाल अगरवाल ला दोन दिवसांची पोलीस कोठडी

 पुणे कार अपघात प्रकरणी विशाल अगरवाल ला दोन दिवसांची पोलीस कोठडी

पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात बेदरकारपणे पोर्श ही अलिशान गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील वृत्त दिलं. या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तसंच, न्यायलयाने अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर ताशेरेही ओढले.

१९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात पोर्श या चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया हे जोडपे जागीच मृत पावले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन मुलाच्या हाती गाडी दिल्यामुळे विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटकही केली आहे. या प्रकरणी पुण्याच्या सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुानवली आहे.

ML/ML/SL

22 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *