२५ मे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करभरणा न केल्यास मालमत्ताधारकांना दरमहा २ टक्के दंड

 २५ मे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करभरणा न केल्यास मालमत्ताधारकांना दरमहा २ टक्के दंड

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम देय शनिवार २५ मे आहे. या मुदतीत करभरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारला जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करभरणा करण्याचा अंतिम देय दिनांकापर्यंतचा कालावधी लक्षात घेता नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून गुरुवार २३ आणि शुक्रवार २४ मे रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच शनिवार २५ मे रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत.

दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात आले. तथापि, अंतिम देय दिनांक जवळ येऊनही अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांकडे तीन दिवसांचा (२५ मे २०२४ पर्यंत) कालावधी शिल्लक आहे. अशा मालमत्ताधारकांनी २५ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करभरणा न केल्यास त्यानंतर त्यांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, अंतिम देय कालावधीच्या काळात करभरणा करताना नागरिकांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाकडून २४ विभाग (वॉर्ड) कार्यालयांसह मुख्यालय तसेच एल विभागातील तुंगा व्हिलेज, एस विभागातील कांजुरमार्ग (पूर्व) येथील लोढा संकूल इमारत आणि पी (पूर्व) विभागातील नवीन नागरी सुविधा केंद्रे गुरुवार, दिनांक २३ आणि शुक्रवार २४ मे रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच शनिवार २५ मे रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत मालमत्ता करासंबंधीत अडचणींच्या निराकरणासाठी सर्व विभागांमध्ये करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतील. अद्यापही करभरणा न केलेल्या नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

SW/ML/SL

22 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *